आर्थिक राशिभविष्य 4 जुलै 2024: या राशींना संपत्ती मिळण्याची शक्यता ! आर्थिक व्यवहार करताना सावध राहा !

गुरूवार, मेष, वृषभ, कर्क सह या राशींसाठी दिवस सर्वोत्तम आहे. मिथुनसह या राशीच्या लोकांनी सांभाळा मौल्यवान वस्तू चोरी होण्याची शक्यता आहे. या राशीच्या लोकांनी पैशांचे व्यवहार करताना सावध राहा. पैसे परत मिळण्याची खात्री असेल तरच व्यवहार करा. मेष ते मीन राशीच्या सर्व राशींसाठी गुरुवार आर्थिक आणि करिअरच्या बाबतीत कसा राहील ते पाहूया.

मेष – जोडीदाराचे सहकार्य मिळेल, पण संततीकडून मात्र निराशा
मेष राशीच्या लोकांना जोडीदाराचे सहकार्य आणि सानिध्य प्राप्त होईल. तुम्हाला कटुतेचे रुपांतर गोडव्यात करण्याची कला आत्मसात करावी लागेल. ग्रहदशेमुळे आज संततीकडूनही निराशजनक बातमी मिळेल. सायंकाळच्या वेळी थांबलेली कामे पूर्ण होतील. रात्रीचा वेळ नातेवाईकांसोबत गप्पागोष्टीत जाईल.

वृषभ – राजकीय क्षेत्रात लाभ मिळण्याची शक्यता
आजचा दिवस समाधान आणि शांतीत जाईल. राजकीय क्षेत्रात केलेले प्रयत्न यशस्वी होतील. शासन आणि सत्तेशी असलेल्या संबंधातून लाभ मिळतील. नवीन व्यवहारातून पद आणि प्रतिष्ठा मिळेल. रात्री काही अप्रिय व्यक्ती भेटल्याने त्रास वाढेल, कष्टांचा सामना करावा लागेल. संततीकडून काही दिलासा मिळेल.

मिथुन – मौल्यवान वस्तूची चोरीची शक्यता, सावध राहा
आज मौल्यवान वस्तूची चोरी किंवा एखादी वस्तू हरवण्याची भीती आहे. संततीचे शिक्षण आणि स्पर्धेत यश तुम्हाला आनंदीत करेल. सायंकाळी एखादे थांबलेली कामे पूर्ण होतील. रात्री एखाद्या उत्साहवर्धक मंगलकार्यात सहभागी होण्याचे भाग्य प्राप्त होईल.

कर्क- ‘या’ कारणामुळे मिळेल उत्तम संपत्ती
आज चंद्राची दशा उत्तम असल्याने संपत्तीचे चांगले संकेत मिळत आहेत. नोकरीच्या क्षेत्रात प्रगती होईल. राज्य, मान, प्रतिष्ठ यात वाढ होईल. संततीबद्दलची जबाबदारी पूर्ण होईल. प्रवास, पर्यटन यांची स्थिती सुखद आणि लाभदायक राहील. सायंकाळपासून ते रात्रीपर्यंत प्रिय व्यक्तीचे दर्शन होईल आणि सुखद बातमी मिळेल.

सिंह – डोळ्यांची घ्या काळजी, धावपळ नकोच
आज तुम्हाला उत्पन्नाचे नवे मार्ग मिळतील. तुमचे बोलणे सौम्य असल्याने तुम्हाला सन्मान मिळेल. शिक्षण आणि स्पर्धेत विशेष यश प्राप्त होईल. आज तुमची धावपळ जास्त होईल आणि डोळ्यांचे विकार होऊ शकतात. शत्रू आपापसांत भांडत संपून जातील.

कन्या – राशिस्वामी प्रसन्न, व्यापारात यश निश्चित
आज राशिस्वामी प्रसन्न राहील त्यामुळे रोजगार आणि व्यापारात सुरू असलेल्या प्रयत्नांना यश मिळेल. संततीकडून आनंदाची बातमी मिळेल. दुपारनंतर एकाद्या कायदेशीर बाबतीत विजय मिळाल्याने आनंदाचे वातवारण राहील. शुभ खर्च होतील, आणि कीर्ती वाढील.

तूळ – आज आनंदी वातावरण, पैसेही येतील हाती
आज तुमच्या चारीबाजूंना सुखद वातावरण राहील. घरी, कटुबांतील सदस्य आनंदात असतील. बऱ्याच दिवसांपासून सुरू असलेली देवाणघेवाणीची समस्या दूर होईल. पुरेशा प्रमाणात पैसे हाती येतील, त्यामुळे सुख वाढेल. विरोधकांचे पराभव होईल. दूरच्या किंवा जवळच्या प्रवासाचे प्रसंग प्रबळ होऊन स्थगित होतील. प्रेमसंबंध दृढ होतील.

वृश्चिक – ग्रहदशा बिघडली, आरोग्य सांभाळा
आजची बिघडलेली ग्रहदशा तुमचे आरोग्य बिघडवू शकते. वात, मूत्र, रक्ताशी संबंधित काही विकार होऊ शकतात. आज या सर्वांचे निदान करावे आणि चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. प्रकृती चांगली नसतानाही चालणे, फिरणे जास्त होईल.

धनू – विरोधकांचा आवाज बंद होईल
आज तुमचे विरोधकही तुमची स्तुती करतील. तुम्ही शासन आणि सत्तेच्या निकट आहात, त्याचा तुम्हाला लाभ होईल. सासरच्या बाजूने पुरेसे पैसे हाती येतील. सायंकाळपर्यंत सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यात लाभ घेण्याची संधी मिळेल.

मकर – आईबाबांची काळजी घ्या, भांडणापासून दूर राहा
आज कौटुंबिक आणि आर्थिक दोन्ही विषयांत यश मिळेल. रोजगाराच्या क्षेत्रात सुरू असलेल्या प्रयत्न यशस्वी होतील. हाताखालील कर्मचाऱ्यांचे सहकार्य मिळेल. सायंकाळी भांडण, वादविवाद यात पडू नका. रात्री काही प्रिय नातेवाईकांचे स्वागताचे योग आहे. आईवडिलांची मात्र काळजी घ्यावी लागेल.

कुंभ – राशिस्वामीमुळे सुखाच्या मार्गात काटे
आज सुखाच्या मार्गात अडथळे येतील. राशिस्वामी शनीमुळे कारण नसताना शत्रुपीडा, बौद्धिक कार्यात नुकसान आणि निराशा राहील. एखादी विपरित बातमी ऐकून आकस्मिक प्रवासाला जावे लागेल, त्यामुळे सावध राहावे. भांडण, वाद यापासून दूर राहा.

मीन – मेव्हाणा किंवा दाजींशी व्यवहार नकोच
आजचा दिवस मुलगा किंवा मुलगीमुळे चिंता राहील आणि त्यांच्या कामात दिवस जाईल. वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतील. आज मेव्हणा किंवा दाजी यांच्याशी देवाणघेवाण करू नका, नातेसंबंध बिघडतील. धार्मिक यात्रा किंवा पूण्यकार्यात पैसे खर्च होतील. प्रवासात सर्तक राहा, कारण मौल्यवान वस्तूची चोरी होण्याची शक्यता.

Leave a Comment