Keda Aaher | विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केदा आहेरांनी देवळा-चांदवड विधानसभा मतदारसंघ पिंजून काढला असून त्यांच्या प्रचार सभांना जनतेकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. अशातच, “माझी रिक्षा मंत्रालयापर्यंत पोहोचेल.” असा थांब विश्वास दा आहेर यांच्याकडून व्यक्त करण्यात आला आहे.
मंत्रालयात जाईपर्यंत रिक्षा थांबत नाही
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केदा आहेर बोलत होते. यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवरती भाष्य केले. उमेदवारी बाबत बोलताना, “ही उमेदवारी सर्वसामान्य जनतेने करायला लावली आहे. जनता माझ्याबरोबर आहे. त्यामुळे माझा विजय निश्चित आहे.” असे म्हणत ठाम विश्वास व्यक्त केला. तसेच, “रिक्षा किती जोरात आहे?” असा प्रश्न विचारला असता, “रिक्षा प्रचंड जोरात असून ती मंत्रालयापर्यंत थांबणार नाही. या मतदार संघाचा विकास डोळ्यासमोर ठेवून त्या दृष्टिकोनातून मी या ठिकाणी विकासाची दिशा घेत निवडणुकीला सामोरे जात आहे.” असे म्हटले आहे.
आमदार झल्यवर चांदवड देवळा मतदासंघासाठी काय करणार..?
“चांदवड-देवळा मतदार संघात एमआयडीसी यायला पाहिजे. या मतदार संघात सर्वात मोठा शेतकरी वर्ग आहे, कांदा उत्पादक मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे कांद्यापासून प्रक्रिया उद्योग या ठिकाणी यायला हवेत. मतदारसंघात पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात आहे. दोन्ही तालुक्यातील पाण्याचा प्रश्न सोडवायचा आहे. तरुणांना रोजगार व नवीन युवा उद्योजक तयार करायचे माझे मनोदय आहे.” असं म्हणत विकास कामांबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. तसेच या मतदार संघात अनेक गावांमध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. फक्त उन्हाळ्यात नाही तर आज सुद्धा पाणी प्रश्न तसाच आहे. अनेक ठिकाणी रस्ते नाहीत. अनेक गावांना स्मशानभूमी देखील नाहीत. अशा अनेक गोष्टी आहेत.” असे म्हणत सत्ताधाऱ्यांच्या कामावर टीका केली.
मी विजयाच्या जवळ पोहोचलो म्हणून टिका सुरू…
“ज्यावेळेस टीका केली जाते, त्याचा अर्थ मी विजयाच्या जवळ पोहोचलो आहे. यामुळे सर्वपक्षीय माझ्यावर टीका करत असून मी विकासाची दिशा घेऊन जनतेसमोर जाणार आहे. त्यामुळे माझ्यावर टीका केली जात आहे. या टीकेला उत्तर देण्याचे काही कारण नाही.” असे म्हटले आहे. तसेच “कुठल्याही लोकप्रतिनिधी करिता त्याने त्याच्या मतदारसंघासाठी काय केले. हे महत्त्वाचे असते. केंद्राच्या व राज्याच्या योजनांच्या जीवावर मत मागणे योग्य नाही.” असे म्हणत विरोधकांना टोला लगावला.
युवक माझ्याकडे आशेचा किरण म्हणून पाहतात….
तसेच, “आम्हाला तरुण वर्गाला दिशा देण्याचा काम करायचे आहे. एमआयडीसी असेल, शेतीपूरक व्यवसाय असतील नवीन युवा उद्योजक बनायला पाहिजेत. हे कुठेतरी दिसले नाही. एज्युकेशन हब व्हायला पाहिजे. जेणेकरून पुणे, मुंबईला जाण्यापेक्षा चांदवड सारख्या शहरात एज्युकेशन हब व्हायला पाहिजे. हे पंधरा वर्षात दिसले नाही. यामुळेच युवक वर्ग माझ्याकडे आशेचा किरण म्हणून पाहतो. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी मी त्यांना सक्षम वाटतो. म्हणून आज तरुणाई माझ्यासोबत आहे.” असे म्हटले.