… म्हणून आजच्या दिवशी केली जाते वटपौर्णिमेचे पूजा; जाणून घ्या वटपौर्णिमेचे महत्व!!

हिंदू धर्मात वटपौर्णिमेला फारच महत्व आहे. आज सगळीकडेच वटपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. वट वृक्षाला ब्रम्हा, विष्णु, महेशाचं रुप मानलं जातं.

अशी आख्यायिका आहे की, वटवृक्षाची पूजा केल्याने त्यांच्या पतीची रक्षा केली जाते. वटवृक्षाच्या फांद्यांना आणि पारंब्यांना सावित्रीचं रुप मानलं जातं. कारण देवी सावित्रीने तपस्या करुन पती सत्यवानाचे प्राण यमाकडून परत आणला होता, असे मानले जाते.

एवढेच नव्हे तर, वटपौर्णिमा म्हणजे सात जन्म तोच पती मिळण्यासाठी महिलांनी करायचे व्रत. हे व्रत केल्यावर आपल्या पतीला जास्त आयुष्य मिळते आणि पुढच्या सात जन्मासाठी आपल्याला तोच पती मिळतो अशी धारणा आपल्या समाजात मागच्या बराच काळापासून रुढ आहे.

वटपौर्णिमेचे महत्व :
▪️ वटवृक्षाच्या फांद्यांना आणि पारंब्यांना सावित्रीचं रुप मानलं जातं. कारण देवी सावित्रीने तपस्या करुन पती सत्यवानाचे प्राण यमाकडून परत आणला होता, असे मानले जाते.

▪️ तर जेष्ठ पौर्णिमा हा दिवस “वटपौर्णिमा” म्हणून साजरा केला जातो. हे व्रत सुवासिनी अपल्या पतिला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून करतात.

Leave a Comment