तुम्हाला तुमचा व्यवसाय यशस्वी करायचा असेल तर हे उपाय अवश्य करा!

मंडळी वास्तुशास्त्राची तत्वे केवळ घरातच प्रभावी नाही तर ती कार्यालय आणि दुकान व कारखाने इत्यादी व्यवसाय क्षेत्रात ही वापरली जाऊ शकते. तुमचा व्यवसाय क्षेत्रात वास्तुदोष असेल तर तुम्हाला व्यवसायात यश मिळू शकणार नाही. वास्तु मध्ये दिशा खूप महत्वाचे आहे आणि व्यवसाय दरम्यान तुमच्या दिशे ची काळजी घेणे तुमच्या साठी खूप महत्वाचे आहे. तुम्हाला तुमचा व्यवसाय यशस्वी करायचा असेल तर वास्तू चे हे उपाय अवश्य करा.

मित्रांनो, व्यवसाय यशस्वी करण्यासाठी दुकान किंवा शो रूम चा दरवाजा भिंती च्या मध्यभागी असणे शुभ असते. दुकाना च्या आत उत्तर व पश्चिम दिशेला शेल्फ शो केस बनवल्या ने तुम्हाला नफा मिळेल आणि तुमचा व्यवसाय वाढेल जर तुम्हाला व्यवसायात नुकसान होत असेल तर तुम्ही प्रत्येक शुक्रवारी लक्ष्मीनारायण मंदिरात जाऊन गुळ. आणि हरभरा चे वाटप करावे हा उपाय केल्यास आई लक्ष्मी चा आशीर्वाद प्राप्त होतात आणि व्यवसायात अपेक्षित यश प्राप्त होते

व्यवसायात अपेक्षित नफा मिळवण्या साठी लाल कपड्यात नारळ बांधून ते पूजा स्थळावर ठेवा किंवा आपल्या कामाच्या ठिकाणी कॅश बॉक्स मध्ये ठेवा आणि दररोज पूजा करताना धूप दिवा दाखवा करिअर किंवा व्यवसाया तील यशा साठी दीड किलो मसूर लाल कपड्यात बांधून आपल्या कामाच्या ठिकाणी पवित्र ठिकाणी ठेवावे. तसेच. घराच्या मुख्य प्रवेशद्वारा वर तेला चा दिवा बनवा आणि त्यात काळी मिरी चे दोन दाणे टाकून दररोज जाळून टाका.

वास्तुशास्त्रानुसार शो रूम किंवा दुकाना चे कॅश बॉक्स दक्षिण आणि पश्चिम भिंतीं च्या आधारे ठेवणे नेहमीच योग्य मानले जाते. तुमच्या व्यवसाया च्या ठिकाणी ईशान्य कोपऱ्यात मंदिर उभारले जाऊ शकते. यासोबतच या भागात पिण्या चे पाणी ठेवणे देखील शुभ मानले जाते. तुम्ही तुमच्या कार्यालयात दुकानात किंवा कारखान्यात पांढरा क्रीम किंवा हलका रंग वापरू शकता. या रंगा मधून सकारात्मकते चा प्रभाव आहे. जे व्यवसाय प्रगती प्रदान करण्यासाठी उपयुक्त मानले जातात.

व्यवसाय यशस्वी करण्यासाठी तुम्ही तुमच्या टेबलावर श्रीयंत्र बिझनेस ग्रोथ यंत्र, क्रिस्टल, कासव क्रिस्टल बॉल इत्यादी ठेवू शकता. यामुळे सकारात्मक ऊर्जे चा प्रभाव होतो. वास्तुशास्त्रानुसार दुकाना च्या मालकाने किंवा व्यवस्थापका ने आपला व्यवसाय क्षेत्रात दक्षिण पश्चिम दिशेला बसावे. व्यवसायात यश मिळवण्या साठी तुम्ही तुमच्या दुकानात किंवा कारखान्यात. पांचजन्य शंख देखील लावू शकता शंख देवी लक्ष्मी चा भाग मान ला जातो. कारण या दोघांची उत्पत्ति समुद्र मंथना तून झाली आहे.

शंख पूजना ने माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि यामुळे तुम्हाला व्यवसायात यश मिळू शकते. व्यवसाया तील आर्थिक मंदी वर मात करण्यासाठी चांदी चे नाणे किंवा तुकडा घ्या आणि पाण्याने भरलेल्या भांड्यात ठेवा आणि कामाच्या ठिकाणी स्वच्छ ठिकाणी ठेवा.

Leave a Comment