18 वर्षांनी होणार राहु-बुध युती या ८ राशींना होणार व्यापारात नफा, होणार प्रमोशन सुरू होणार फलदायी काळ!

ज्योतिषशास्त्रानुसार, मार्च महिना विविध शुभ योगांचा जाऊ शकेल, असे म्हटले जात आहे. मार्च महिन्यात ५ ग्रहांचे गोचर होणार आहे. नवग्रहांचा राजकुमार मानला गेलेला बुध कुंभ राशीत असून, ०७ मार्च रोजी मीन राशीत प्रवेश करणार आहे. मीन ही गुरुचे स्वामित्व असलेली रास असून, या राशीत आताच्या घडीला राहु विराजमान आहे.

बुध ग्रहाने मीन राशीत प्रवेश केल्यानंतर राहु आणि बुध यांचा युती योग जुळून येत आहे. बुध हा शुभ ग्रह मानला जातो. तर, राहु क्रूर आणि पापग्रह मानला जातो. या दोन्ही ग्रहांची युती विशेष मानली जात आहे. सुमारे १८ वर्षांनी राहु आणि बुध यांचा मीन राशीत युती योग जुळून येत आहे.

गुरुचे स्वामित्व असलेल्या मीन राशीत राहुचे विराजमान असणे आणि बुध प्रवेशाने युती योग जुळून येणे हे काही राशींसाठी अनुकूल ठरू शकेल. आगामी काळ शानदार जाऊ शकेल. जीवनातील विविध आघाड्यांवर लाभ मिळू शकतील, असे सांगितले जात आहे. जाणून घ्या…

वृषभ: शुभ परिणाम मिळू शकतील. करिअरमध्ये उत्तम परिणाम मिळू शकतील. बँक बॅलन्समध्ये चांगली वाढ होईल. नोकरदारांना कठोर परिश्रम करावे लागतील. अधिकाऱ्यांकडून कौतुक होईल. व्यवसायिकांना नफा होऊ शकेल. विविध प्रकारच्या संधी मिळू शकतात. शेअर बाजारातून भरपूर नफा मिळू शकेल. काही विशेष गुंतवणूक करण्यासाठी काळ अनुकूल आहे. कौटुंबिक जीवन चांगले राहील. सर्व सदस्यांमध्ये परस्पर प्रेम असेल.

मिथुन: अपार धनसंपदा मिळू शकेल. प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकते. व्यवसायात भरघोस नफा मिळण्याबरोबरच यश मिळेल. भागीदारीत चालवले जाणारे व्यवसाय आर्थिक लाभ मिळवू शकतात. नवीन काम सुरू करू शकता. लाभ मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. जीवनात सकारात्मकता येईल.

कर्क: राहु-बुध युती अनुकूल ठरू शकेल. अपूर्ण कामे पूर्ण होतील. सरकारी कामातही फायदा होईल. उच्च शिक्षणासाठी परदेशी महाविद्यालयात प्रवेश घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काळ अत्यंत फलदायी ठरणार आहे. विविध स्त्रोतांकडून पैसे मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिक गरजांसाठी विविध प्रवास करावे लागण्याची शक्यता असून, ते शुभ ठरतील. जोडीदाराच्या सल्ल्याने अनेक फायदे मिळतील. नाते घट्ट होईल.

सिंह: राहु-बुधाचा युती योग शानदार ठरू शकेल. अनेक आर्थिक लाभ मिळतील. नवीन संकल्पनांवर काम करू शकाल. संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे. उर्जेने परिपूर्ण असाल. आत्मविश्वास मजबूत होऊ शकेल. कौटुंबिक आणि वैवाहिक जीवन चांगले राहील. प्रतिमा सुधारेल. नोकरदारांना चांगला फायदा होईल, पदोन्नतीची शक्यता आहे. विवाहेच्छुकांना चांगली स्थळे येऊ शकतील.

तूळ: वैवाहिक जीवन खूप चांगले जाणार आहे. रखडलेली कामे पुन्हा सुरू होतील. भागीदारीत केलेले काम यशस्वी होईल. यासोबतच हरवलेले किंवा अडकलेले पैसे तुम्हाला मिळतील. उत्पन्नाचे स्रोत वाढतील. व्यवसायात भरपूर नफा मिळण्याची शक्यता आहे. नशिबाने पूर्ण साथ दिल्याने आर्थिक परिस्थिती चांगली राहील. समाजात मान-सन्मान वाढेल. नोकरदारांना खूप फायदा होऊ शकेल. मित्र आणि जवळच्या लोकांचे सहकार्य मिळेल. पदोन्नतीसह वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. जे लाभ पूर्वी मिळत नव्हते ते आता मिळण्याची शक्यता आहे.

वृश्चिक: राहु-बुध युतीने मनोकामना पूर्ण होऊ शकतात. करिअरमध्ये सर्जनशीलता वाढू शकेल. कामाच्या ठिकाणी प्रशंसा मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिक उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी चांगला काळ असेल. कामाच्या ठिकाणी सहकारी आणि वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. आर्थिक आघाडीवर लाभ होण्याची शक्यता आहे. संपत्तीमध्ये वाढ होईल. मान-सन्मान वाढेल. चैनीच्या वस्तूंवर पैसे खर्च होऊ शकतील. मुलांकडून आनंद मिळण्याची शक्यता आहे. प्रेमजीवन उत्तम राहू शकेल.

कुंभ: शुभ फल मिळू शकेल. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. आयुष्यातील दीर्घकाळ चाललेल्या समस्या हळूहळू संपुष्टात येतील. जीवनात स्थिरता येईल. व्यवसायात दीर्घकालीन तोट्यातून सुटका होण्याची शक्यता आहे. मोठा नफा कमावण्याची संधी मिळेल. नोकरदारांनाही लाभ मिळण्याची शक्यता आहे.

मीन: या राशीत विराजमान असलेल्या राहुशी बुधाची होणारी युती लाभदायक ठरू शकेल. सर्व इच्छा पूर्ण होतील. आत्मविश्वास वाढेल. वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात योग्य निर्णय घेऊ शकाल. समाजात मान-सन्मान नवीन उंचीवर जाईल. कामाचे सर्वत्र कौतुक होईल. करिअरमध्ये प्रगती होऊ शकेल. समाधान वाटेल. शत्रू आणि विरोधकांवर वर्चस्व गाजवू शकाल. सर्व प्रकारच्या आव्हानांना धैर्याने सामोरे जाल. व्यापारी वाजवी नफा कमावतील. प्रतिस्पर्ध्यांना तगडी टक्कर देऊ शकतील.

Leave a Comment