शनिदेव ठरणार डोक्याला ताप. 2025 मध्ये या राशीमागे सुरू होणार शनीची साडेसाती!

शनिदेव हा सर्व ग्रहांमध्ये सर्वात महत्त्वाचा ग्रह असून त्याचा परिणाम प्रत्येक राशीवर होतो. शनीची दशा आणि शनीची साडेसातीची प्रत्येकाला भीती वाटते. 4 नोव्हेंबरला शनिदेव आपली चाल बदलणार आहे. त्यामुळे पुढील दोन वर्ष काही राशींसाठी त्रासदायक ठरणार आहे. ज्योतिषशास्त्रात शनिदेवाला कर्म, न्याय आणि धर्माचं कारक मानला जातो.

तो मानवला त्याच्या कर्मानुसार फळं देतो. त्यामुळे जाचकाला शनिदेवाची भीती वाटते. शनिदेव हा संथ गतीने आपली स्थिती बदलतो. तो एका राशीत अडीच वर्ष विराजमान असतो. सध्या या वर्षाच्या सुरुवातीला शनिदेव स्वगृही कुंभ राशीत विराजमान आहे. अशात कर्मकार ग्रह 4 नोव्हेंबर आपली चाल बदलणार आहे. यामुळे शनिदेव पुढील दोन वर्ष म्हणजे 2025 पर्यंत अनेक राशींसाठी त्रासदायक ठरणार आहे. यात तुमची रास आहे का जाणून घ्या.

मिथुन
शनीदेव मिथुन राशीच्या लोकांसाठी त्रासदायक ठरणार आहे. घरातील वरिष्ठ मंडळींच्या प्रकृतीकडे लक्ष द्या. त्याशिवाय मुलांकडून वाईट बातमी मिळण्याची शक्यता आहे. तुमच्यावर या दोन वर्षात दुःखाचा डोंगर कोसळण्याची भीती आहे. कार्यक्षेत्रात बदल घडणार आहे.

कर्क
कर्क राशीच्या लोकांसाठी देखील शनिदेव वादळ घेऊन येणार आहे. तुमच्या राशीमध्ये अष्टम धैय्या असल्याने तुम्हाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे. या लोकांना आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे. कौटुंबिक जीवनात संकट कोसळणार आहे. हा काळ तुमच्यासाठी वाद आणि अडचणींचा ठरणार आहे.

सिंह
या राशींसाठीदेखील शनिदेव अतिशय वाईट ठरणार आहे. वैवाहिक कार्यात मोठे अडथळे येणार आहेत. व्यवसायिकांसाठी हा शनिदेव कठीण काळ घेऊन येणार आहे. तुमचं आर्थिक नुकसान होणार आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासात लक्षकेंद्रीत करावे नाही तर अपयशाची दाट शक्यता आहे. कुटुंबात मतभेद होईल.

मकर
शनिदेव तुमच्या राशीत वादळ आणणार आहे. या काळात शनीची साडेसाती तुम्हाला अतिशय त्रासदायक ठरणार आहे. तुम्हाला अनेक आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. यावेळी तुम्हाला कुटुंबातही अनेक गोष्टींना तोंड द्यावे लागणार आहे.

मीन
या राशींसाठी शनिदेव डोकेदुखी ठरणार आहे. (Horoscope Shani Sadesati 2025) कारण मीन राशीच्या बाराव्या घरात शनि विराजमान असल्याने तुमच्या जीवनात मोठे बदल होणार आहे. या काळात तुमच्या जीवनात अनेक गुंतागुंत वाढणार आहे. तुमच्या आरोग्याकडे खास करुन डोळ्यांकडे लक्ष द्या. तुमचं जोडीदाराशी वाद होणार असून नात्यात तणाव निर्माण होईल.

Leave a Comment