आर्थिक राशिभविष्य 7 फेब्रुवारी 2024 बुधवार: सिद्ध योगामुळे धनु सह या ५ राशींची वाढणार संपत्ती!

बुधवार ७ फेब्रुवारी मेष, कर्क आणि कन्या राशीसाठी शुभलाभ असून रखडलेली कामे मार्गी लागणार आहेत. धनु, मकर आणि कुंभ साठी आर्थिक स्थिती उत्तम राहणार आहे.तुमच्या राशीमध्ये काय लिहीले आहे ते जाणून घेण्याची तुम्हाला उत्सूकता नक्कीच असेल. चला तर पाहुया बुधवारचे आर्थिक राशिभविष्य

मेष आर्थिक राशिभविष्य
संध्याकाळी काही रखडलेली कामे होण्याची शक्यता आहे. मुलांच्या बाजूने तुम्हाला निराशाजनक बातमी मिळू शकते. रात्रीचा वेळ प्रियजनांना भेटण्यात आणि आनंदात व्यतीत होणार आहे. गोड बोलून आपले काम साध्य करण्याची कला तुम्हाला शिकावी लागेल. जोडीदाराकडून योग्य ते सहकार्य मिळणार आहे.

वृषभ आर्थिक राशिभविष्य
आजचा दिवस तुमच्यासाठी समाधान आणि शांततेत जाणार आहे. राजकीय क्षेत्रात केलेले प्रयत्न यशस्वी होतील. नवीन करारांमुळे पद, प्रतिष्ठा वाढेल. रात्री काही अप्रिय लोकांना भेटल्याने अनावश्यक त्रास होईल. मुलांच्या बाजूने थोडा दिलासा मिळेल.

मिथुन आर्थिक राशिभविष्य
कोणतीही मौल्यवान वस्तू हरवण्याची किंवा चोरी होण्याची भीती आहे तेव्हा सावध राहा. मुलांच्या शिक्षणाची किंवा कोणत्याही स्पर्धेत यश मिळाल्याची बातमी तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे तुमचा दिवस अगदी आनंदात जाणार आहे. रखडलेली कामे सायंकाळपर्यंत पूर्ण होतील. रात्रीच्या वेळी मंगल कार्यात तुम्ही सहभागी व्हाल.

कर्क आर्थिक राशिभविष्य
कर्क राशीच चंद्र सहाव्या स्थानावर असल्यामुळे भरघोस संपत्तीचे संकेत मिळत आहेत. उपजीविकेच्या क्षेत्रात प्रगती होणार आहे. तुमचा मान-सन्मान वाढणार असून प्रवासाचा योग दिसून येतो आहे. प्रवास सुखकर आणि फायदेशीर होणार आहे. सायंकाळपासून रात्रीपर्यंत तुम्हाला आनंदाची बातमी मिळेल आणि प्रियजनांची भेट होईल.

सिंह आर्थिक राशिभविष्य
सिंह राशीचा स्वामी सूर्य हा शत्रूंच्या सहाव्या स्थानात मकर राशीत आलेला आहे. त्यामुळे उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होतील. बोलण्यातील सौम्यता ठेवा यामुळे तुम्हाला मान-सन्मान मिळू शकतो. शिक्षण आणि स्पर्धेत यश मिळेल. उन्हामुळे अधिक धावपळ आणि डोळ्यांचे विकार होण्याची शक्यता असते. आज तुम्हाला शत्रूचा त्रास होणार नाही ते आपापसात लढत राहतील.

कन्या आर्थिक राशिभविष्य
रोजगार व्यवसायाच्या क्षेत्रात सुरु असलेल्या तुमच्या प्रयत्नांमध्ये अकल्पनीय यश तुम्हाला मिळणार आहे. मुलांच्या बाजूने समाधानकारक बातमी मिळेल त्यामुळे तुम्ही आनंदी असाल. कोर्ट-कचेरी किंवा एखादा कायदेशीर वाद सुरु असेल तर निकाल तुमच्या बाजूने लागेल आणि दुपारनंतर तुम्हाला ही आनंदवार्ता समजेल. चांगल्या कामासाठी खर्च होणार असून तुमची यश किर्ती वाढणार आहे.

तुळ आर्थिक राशिभविष्य
आज तुमच्या सभोवतालचं वातावरण प्रसन्न असणार आहे. कुटुंबातील सर्व सदस्यांच्या आनंदात वाढ होईल. अनेक दिवसांपासून सुरू असलेली मोठी व्यवहारामधील समस्या सुटू शकते. हातात पुरेसे पैसे मिळाल्याचा आनंद मिळेल. विरोधकांचा पराभव होईल. प्रवासाचे नियोजन तुम्ही केलेले असेल पण काही कारणामुळे हा प्रवास पुढे ढकलला जाणार आहे. प्रेमसंबंध दृढ होणार आहेत.

वृश्चिक आर्थिक राशिभविष्य
तुम्हाला तब्येतीची खास काळजी घ्यावी लागणार आहे. बदलते हवामान याचा त्रास तुम्हाला होवू शकतो किंवा तुम्हाला रक्त किंला लघवीचा विकार असले तर तो आजार पुन्हा प्रबळ होवू शकतो. तुम्ही तातडीने आरोग्याची तपासणी करा आणि शक्य झाले तर तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे. तुमची धावपळ जास्त होते आहे त्याला थोडं कमी करण्याचा प्रयत्न करा.

धनु आर्थिक राशिभविष्य
आज विरोधकही तुमचे कौतुक करतील. सरकारी कामात तुम्ही यशस्वी होणार आहात. सासरच्या मंडळींकडून धनलाभ होणार आहे. सायंकाळपासून रात्रीपर्यंत सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल.

मकर आर्थिक राशिभविष्य
कौटुंबिक आणि आर्थिक बाबतीत तुम्हाला यश मिळेल. उपजीविकेच्या क्षेत्रात सुरू असलेले नवे प्रयत्न फलदायी ठरणार आहेत. तुमच्या सहाय्यक कर्मचाऱ्यांकडून तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळणार आहे, ज्यामुळे कामे पटापट होतील. संध्याकाळी कोणत्याही भांडणात पडू नका. रात्री तुमचे प्रिय पाहुणे येणार आहेत तेव्हा स्वागतासाठी सज्ज राहा. पालकांची विशेष काळजी घ्या.

कुंभ आर्थिक राशिभविष्य
आज तुमची तब्येत बिघडण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमच्या आनंदावार थोडं विरजण पडेल. विनाकारण वाद होण्याची शक्यता आहे, तेव्हा सावध राहा कारण हा वाद भविष्यकाळात तुमचे मोठे नुकसान करु शकतो. काही वाईट बातमी ऐकून तुम्हाला अचानक प्रवासाला करावा लागू शकतो. सावध राहा आणि शक्यतो भांडणे/वाद टाळा.

मीन आर्थिक राशिभविष्यआजचा दिवस मुलांची काळजी आणि त्यांच्या भविष्याची चिंता तुम्हाला त्रस्त करणार आहे. कौटुंबित जीवनात अनेक दिवसांपासून सुरू असलेला वाद-विवाद संपुष्टात येणार आहे. पत्नीकडील नातेवाईकांसोबत शक्यतो आज काहीही व्यवहार करू नका. संबंध बिघडण्याचा धोका आहे. धार्मिक स्थळांचा प्रवास आणि चांगल्या कामासाठी आज खर्च होणार आहे. प्रवासात सावधानता बाळगा. गुरूच्या त्रिकोण योगामुळे मौल्यवान वस्तूंची चोरी होऊ शकते.
पराग शर्मा यांच्याविषयी

Leave a Comment