बुध ग्रहाचे मकर राशीत संक्रमण ! बुधादित्य राजयोग, या 5 राशींसाठी भाग्योदय, करिअरमध्ये दैदीप्यमान यश!

16 फेब्रुवारीला बुध मकर राशीत प्रवेश करेल. बुध हा शुभ प्रभाव देणारा ग्रह मानला जातो. बुध ज्या राशीमध्ये शुभ स्थितीत असतो त्या राशीच्या लोकांना ज्ञान आणि बुद्धीबरोबरच उत्तम आरोग्य व भौतिक सुविधा मिळते. सूर्यासह मकर राशीत येणारा बुध बुधादित्य राजयोग तयार करतो आहे,

जो धन प्राप्तीसाठी अत्यंत शुभ मानला जातो आणि अत्यंत शुभ परिस्थिती निर्माण करतो. या गोचरामुळे मेष आणि वृषभसह 5 राशींच्या जीवनातील आनंद द्विगुणीत होणार आहे तसेच करिअरमध्ये मोठे यश प्राप्त होणार आहे.

मेष राशीवर बुध संक्रमणाचा प्रभाव
बुधाचे संक्रमण मेष राशीसाठी दशम स्थानात होते आहे. या संक्रमणामुळे करिअरमध्ये भरपूर फायदा होणार आहे तसेच तुम्ही जे काही करण्याचा विचार कराल त्यात तुम्हाला यश मिळेल. प्रत्येक काम वेळेत पूर्ण होईल. मेहनत करून यश नक्कीच मिळेल. नोकरीत काही प्रकारचा बदल होऊ शकतो आणि तो तुमच्या बाजूने असेल.

आर्थिक बाबतीत खर्च करताना सारासार विचार करणे उत्तम आहे, अन्यथा महिन्याच्या अखेरीस पैशांची कमतरता भासू शकते. जोडीदारासोबतचे तुमचे नाते पूर्वीपेक्षा अधिक दृढ होईल. उपाय म्हणून दर बुधवारी लाल रंगाचा पोशाख परिधान करा.

वृषभ राशीवर बुध संक्रमणाचा प्रभाव
वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी बुधाचे संक्रमण नवम स्थानात होईल आणि करिअरमध्ये शुभ परिणाम घेऊन येईल. तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवे स्त्रोत येतील आणि पैसे कमविण्याची इच्छा वाढेल. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे आणि तुम्ही तुमच्या भविष्याशी संबंधित निर्णय घेऊ शकाल.

चांगले पैसे कमावण्यासाठी नशीबाची उत्तम साथ मिळेल आणि मनाप्रमाणे चांगल्या ठिकाणी खर्च करू शकाल. करिअरच्या बाबतीत तुम्ही यशोशिखरावर पोहोचणार आहात, तसे योग जुळून येत आहेत. व्यवसायात कुठेतरी अडकलेले पैसे मिळाल्यामुळे तुम्ही जुन्या योजना पुन्हा सुरू करू शकता. प्रेमप्रकरणांमध्ये जोडीदारासोबत सामंजस्य ठेवा. उपाय म्हणून दर बुधवारी 5 मुलींना भेटवस्तू द्या.

कन्या राशीवर बुध संक्रमणाचा प्रभाव
बुध संक्रमणाच्या शुभ प्रभावाने कन्या राशीच्या लोकांना करिअरमध्ये नवीन संधी मिळतील. तुमच्या जीवनात सुख-समृद्धी वाढेल. तुम्ही प्रगतीच्या मार्गावर वाटचाल करणार आहात. बुधाच्या संक्रमणामुळे करिअरमध्ये मोठे यश मिळू शकते. तुमचे ध्येय सहजपणे साध्य करू शकाल.

या काळात तुम्ही जे काही काम कराल, ते मन लावून आणि मेहनतीने कराल तुम्हाला यश नक्की मिळेल. व्यवसायातही या काळात चांगला परतावा मिळेल. तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील. उपाय म्हणून दर बुधवारी हिरव्या भाज्या खा.

तुळ राशीवर बुध संक्रमणाचा प्रभाव
बुधाचे संक्रमण तुळ राशीच्या लोकांच्या जीवनात शुभ प्रभाव वाढवणारे मानले जाते आहे. घरातील सोयी-सुविधा वाढतील आणि कुटुंबाच्या सर्व गरजा सहजपणे पूर्ण करू शकणार आहात. करिअरमध्ये परिस्थिती तुमच्या बाजूने राहील आणि कामाच्या ठिकाणी वातावरण चांगले राहील. तुम्ही तुमच्या आत्ताच्या स्थितीवर खूप समाधानी असाल.

तुमचे आरोग्य चांगले राहील आणि तुमच्या आत एक नवी ऊर्जा निर्माण होईल. जोडीदारासोबत तुमचे संबंध दृढ होतील आणि एकमेकांच्या सल्ल्याने तुम्ही चांगले काम करू शकाल. यावेळी पैसे कमावणे आणि चांगली बचत करणे दोन्ही शक्य होणार आहे. उपाय म्हणून दर बुधवारी गायीला पालक खायला द्यावा.

कुंभ राशीवर बुध संक्रमणाचा प्रभाव
बुधाच्या संक्रमणामुळे कुंभ राशीच्या लोकांसाठी आर्थिक लाभ होणार आहे. वडिलोपार्जित मालमत्तेतून तुम्हाला विशेष लाभ मिळू शकेल आणि तुमच्या संपत्तीत वाढ होईल. या वेळी तुम्हाला मोठी लॉटरी लागू शकते, मात्र, करिअरमध्ये तुम्हाला खूप दडपणाचा सामना करावा लागेल.

एक गोष्ट लक्षात ठेवा मेहनत केल्यानंतर तुम्हाला नक्की यश मिळेल आणि कामाचे कोणतेही दडपण तुम्हाला जाणवणार नाही. लवलाइफमध्ये तसेच कौटुंबिक बाबतीत नम्रपणे बोलावे असा खास सल्ला तुमच्यासाठी आहे, अन्यथा तुमच्या नात्यावर परिणाम होऊ शकतो. व्यवसाय करणाऱ्यांना चांगलाच फायदा होणार आहे. यावर उपाय म्हणून दर बुधवारी तृतीयपंथीयांना दान करा.

Leave a Comment