कोणी केले होते सरस्वती मातेचे सर्वात पहिले पूजन? जाणून घ्या कथा!

वसंत पंचमीच्या दिवशी देवी सरस्वती मातेची पूजा करण्यामागे अनेक मान्यता आहेत. या दिवशी माता सरस्वतीचे स्मरण करून, माता सरस्वतीच्या नावाने पूजा व स्नान, दान व ध्यान केल्याने आपल्या मनात वसलेली सरस्वती माता वाणीवर विराजमान होते. अज्ञानी लोकही ज्ञानी होऊन समाजात नाव, मान-सन्मान आणि यश किर्ती प्राप्त करतात. चला तर मग जाणून घेऊया सरस्वती मातेची प्रथम पूजा कोणी केली होती.

डोक्यावर मोराचा मुकुट, गळ्यात वैजयंतीची माळ, सर्वांचे स्वामी, सर्वांचा आधार, परमदेव भगवान श्रीकृष्ण यांची सर्वप्रथम माता सरस्वतीची पूजा केली होती. ब्रह्म वैवर्तपुराणातील प्रकृती खंडानुसार भगवान श्रीकृष्णाने पूजा केल्यावर, माता सरस्वतीची सर्व जगात पूजा सुरु झाली.

सर्वजण माता सरस्वतीची आराधना करू लागले. असे म्हणतात जर सरस्वती मातेची कृपा झाली तर मूर्खही पंडित होतो. भगवान श्रीकृष्णांनी सरस्वतीला हे वरदान दिले की, विश्वातील प्रत्येक माघ शुक्ल पंचमीच्या दिवशी शिक्षण सुरू होण्याच्या शुभ मुहूर्तावर तुमची मोठ्या अभिमानाने आणि श्रद्धेने पूजा केली जाईल.

भगवान श्रीकृष्ण यांनी सरस्वती मातेला असे ही सांगितले की, “माझ्या वरदानाच्या प्रभावाने आजपासून प्रलयापर्यंत प्रत्येक चक्रात मनुष्य, देवता, मुनिगण, योगी, नाग, गंधर्व, दानव हे सर्व जण सोळा प्रकारच्या उपायांद्वारे मोठ्या भक्तीभावाने तुमची उपासना करतील.’’ तेव्हापासून माघ शुक्ल पंचमीच्या दिवशी सर्वजणसरस्वती मातेची पूजा करू लागले आणि हा दिवस सरस्वती जयंती म्हणूनही ओळखला जाऊ लागला.

सरस्वती पूजनाचे महत्त्व –
शिक्षण सुरू होण्याच्या शुभमुहूर्तावर सरस्वती मातेची पूजा केली जाते. व्यास मुनींनी जेव्हा वाल्मिकी ऋषींना पुराणसूत्राविषयी विचारले तेव्हा ते सांगू शकले नाहीत. अशा वेळी व्यास मुनींनी माचा जगदंबा सरस्वतीची स्तुती केली, तेव्हा त्यांच्या कृपेने वाल्मिकी ऋषींना ज्ञान प्राप्त झाले आणि त्यांनी सिद्धांताचे प्रतिपादन केले. सरस्वती मातेकडून वरदान मिळाल्यानंतर व्यास मुनी कवीश्वर झाले आणि त्यांनी पुराणांची रचना केली.

सरस्वती मातेची उपासना केल्यानेच इंद्राला ग्रंथ हा शब्द आणि त्याचा अर्थ समजू शकला, म्हणून ज्ञानप्राप्तीसाठी देवीची उपासना करणे चांगले आहे. माता सरस्वतीच्या प्रसादाने शुक्राचार्य हे सर्व राक्षसांचे पूजनीय गुरु बनले. सरस्वतीच्या कृपेने भगवान वेदव्यासांना चार वेदांची विभागणी करून संपूर्ण पुराणांची रचना करता आली.

ज्ञानामुळे फक्त शब्द समजू शकतात आणि अनुभवाने त्याचा खरा अर्थ समजतो. मनुष्याच्या व्यक्तीमत्व विकासासाठी ज्ञान किंवा शिक्षण अत्यंत गरजेचे आहे. ज्या प्रमाणे शारीरिक विकासासाठी अन्नाची गरज असते, तशीच मेंदूच्या विकासासाठी ज्ञानाची गरज असते.

पूजा विधी – ब्रह्म मुहूर्तात नित्यकर्म झाल्यानंतरशरीर आणि मन शुद्ध करून कलशाची स्थापना करावी. त्यानंतर श्री गणेश, सूर्यदेव, अग्निदेव, विष्णू, शिव आणि शिव यांची पूजा करून, स्थापित कलशात ज्ञानाची देवी सरस्वतीचे आवाहन आणि ध्यान करावे. विद्यार्थी, कवी, लेखक, पंडित, ब्राह्मण, ज्योतिषी, तत्त्वज्ञ, साहित्यीक, कथाकार आणि सर्जनशील निर्मात्यांची देवी सरस्वती देवी आहे.

त्यामुळे विद्यार्थी आणि शिकण्याची इच्छा असणाऱ्या सर्व अभ्यासकांनी दररोज सरस्वती देवीची पूजा अवश्य करावी. विद्यार्थ्यांना शिक्षणाचे मर्म कळते आणि सुज्ञ लोकांना सरस्वती मातेच्या कृपेने शिक्षणाचे मर्म समजते.
अनिता किंदळेकर यांच्याविषयी

Leave a Comment