महाशिवरात्रीपूर्वी शुक्र, शनि आणि सूर्य एकत्र येण्याआधी या राशींचे लोक होतील धनी. बँक बॅलेन्स मध्ये होईल चांगलीच वाढ!

प्रत्येक ग्रह विशिष्ट वेळी आपली राशी आणि नक्षत्र बदलतो. कधीकधी एका राशीमध्ये एकापेक्षा जास्त ग्रहांचे संक्रमण होते. ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहाची स्थिती बरेच काही सांगून जाते. कोणत्या स्थितीत ग्रह कोणते परिणाम देईल हे पाहणे महत्त्वाचे आहे.

ज्योतिष शास्त्रानुसार शनीने 30 वर्षांनी कुंभ राशीत प्रवेश केला आहे. फेब्रुवारीमध्ये सूर्य कुंभ राशीत येईल. 7 मार्च रोजी शुक्राचेही या राशीत भ्रमण होईल. अशा स्थितीत शुक्र, शनि आणि सूर्य कुंभ राशीत आल्याने त्रिग्रही योग तयार होईल.

मेष
मेष राशीच्या लोकांसाठी त्रिग्रही योग शुभ राहील. सर्व मनोकामना पूर्ण होतील. करिअरमध्ये मोठी उंची गाठू शकाल. या काळात नोकरीच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. भरपूर पैसा मिळण्याची शक्यता आहे. शेअर बाजारात गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. न्यायालयीन खटल्यात तुम्ही संघर्ष करत असाल तर दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

मिथुन
मिथुन राशीच्या लोकांसाठी त्रिग्रही योग आशीर्वाद देईल. या काळात नशिबाची साथ मिळण्याची शक्यता आहे. नोकरीत प्रगतीच्या नवीन संधी मिळतील. जुन्या गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो. या काळात तुम्ही नवीन वाहन खरेदी करू शकता.

कुंभ
कुंभ राशीच्या लोकांना त्रिग्रही योगाचा लाभ होण्याची शक्यता आहे. व्यवसायाला गती मिळू शकते. व्यावसायिक लोकांना काही चांगली बातमी मिळू शकते. समाजात प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे. बँक बॅलन्समध्येही चांगली वाढ होऊ शकते. त्रिग्रही योगामुळे घरात आनंदाचे वातावरण राहील.

Leave a Comment