मनोभावे स्वामींची सेवा करताय मग जाणून घ्या स्वामींना कुठला नेवेद्य दाखवावा आणि दाखवताना कोणता मंत्र म्हणावा!

श्री स्वामी समर्थ. स्वामी हे या जगाचे चालक मालक आणि पालक आहेत. तर मित्रांनो, अजच्या लेखात आपण स्वामींना नेवेद्य दाखवताना म्हणावयाचे मंत्र जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात. नेवेद्य दाखवताना एका ताटात (भाजी-भाकरी, पोळी, भात,भजे पापड, मीठ, गोड पदार्थ, विडा) यापैकी जे असेल ते घ्यावे.

स्वामींच्या अधिष्ठानासमोर एका पाटावर पाण्याने (तांब्यातील पाण्यात आपले उजव्या हाताची मधली दोन बोटे बुडवून घेऊन) एक चौकोन काढावा, त्या चौकोनावर हे ताट ठेवावे. ताटाच्या बाजुला एक तांब्या भर पाणी ठेवावे.

ताटातील पदार्थावर व तांब्यातील पाण्यात तुळशी पत्रे टाकावीत. दिवा, धुप किंवा अगरबत्ती लावून स्वामींना ओवाळावे. तांब्यातील एक तुळशी पत्र घेऊन नैवेद्यावर तीन वेळा पाणी शिंपडावे व तीन वेळा फिरवावे. पाणी शिंपडताना गायत्री मंत्र म्हणावा, गायत्री मंत्र येत नसेल तर ‘श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ’ हा मंत्र म्हणून तीन वेळा पाणी शिंपडावे.

यानंतर मग तीन वेळा पाणी फिरवताना, ‘ॐ प्राणाय स्वाहा:।, ॐ अपानाय स्वाहा:।, ॐ व्यानाय स्वाहा:।, ॐ उदानाय स्वाहा:।, ॐ समानाय स्वाहा:। ॐ ब्रह्मणे अमृत्वाय स्वाहा:।’ हे मंत्र अथवा ‘श्री स्वामी समर्थ’ हा मंत्र म्हणून तीन वेळा पाणी ताटावरुन फिरवावे. नंतर ते तुळशीपत्र स्वामींना अर्पण करुन नमस्कार करावा. अशा प्रकारे स्वामींना नैवेद्य दाखविला जातो.

नैवेद्य दाखविल्यानंतर 15-20 मिनिंटानी ते नैवेद्याचे ताट स्वामींना नमस्कार करुन उचलून घ्यावे व आपल्या भाजीत भाजी आणि भाकरीत भाकर मिळसावी. जेणेकरून घरात कायम अन्नपुर्णेचा वास राहिल. वरील प्रमाणे आपण परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांची पुजा करावी. या सोबत रोज श्री स्वामी चरित्र सारामृत या पोथीचे 1/3/7 अध्याय वाचन करावे.

रोज श्री गुरुस्तवन स्तोत्र, श्री स्वामीचरित्र स्तोत्र, श्री स्वामी पाठ आणि तारक मंत्रासह किमान 3 माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करावा. याला स्वामींची नित्यसेवा असे म्हणतात. जो कोणी एवढी स्वामींची नित्यसेवा करतो. त्यांचा संपुर्ण योगक्षेंम स्वत: स्वामी महाराज चालवतात. असे अभिवचन स्वामी महाराजांनी दिलेले आहे. तेव्हा ही सेवा करून आपले जीवन सार्थकी लावावे, ही नम्र विंनती.

Leave a Comment