शनि-बुध संयोगामुळे येत्या दोन दिवसांत फळफळणार या तीन राशींचे नशीब! मिळणार बक्कळ पैसा आणि प्रत्येक कामात यश!

वैदिक ज्योतिषशास्त्रात बुध ग्रहाला व्यवसाय, दळणवळण, शेअर बाजार, मार्केटिंग व अर्थव्यवस्थेचे कारक मानले जाते. तर, शनिदेव हे कर्मदाता आणि न्याय देणारे मानले जातात. त्यामध्ये बुध आणि शनिदेव यांचाही संयोग होणार आहे.

24 फेब्रुवारीला कुंभ राशीमध्ये मित्र ग्रह शनी आणि बुध यांची युती होणार आहे. त्यामुळे या संयोगाचा प्रभाव सर्व राशींच्या लोकांवर दिसून येईल. पण, अशा तीन राशी आहेत की, ज्यांचे करिअर आणि बिझनेसमधील नशीब फळफळू शकते. चला जाणून घेऊ कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी…

मिथुन
शनि आणि बुध यांच्या संयोगाने मिथुन राशीच्या लोकांसाठी चांगले दिवस सुरू होऊ शकतात. कारण- तुम्हाला वेळोवेळी अनपेक्षित पैसे मिळू शकतात.तसेच तुमची प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. या कालावधीत तुम्ही देश-विदेशांतही प्रवास करू शकता. तुम्हाला कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल; ज्यामुळे समाजात तुमची प्रतिष्ठा कायम राहू शकते.

नोकरी व व्यावसायिकांच्या उत्पन्नात चांगली वाढ होऊ शकते आणि करिअरमध्ये ते चांगली प्रगती करू शकता. तसेच जे विद्यार्थी आहेत, त्यांच्यासाठी हा काळ शुभ राहील. जर ते परदेशात जाऊन शिक्षण घेण्याचा विचार करीत असतील, तर त्यांची इच्छा पूर्ण होऊ शकते.

कुंभ राशी
बुध आणि शनीचा संयोग कुभ राशीसाठी अनुकूल ठरू शकतो. यावेळी तुमचा आत्मविश्वास वाढू शकेल. तसेच, या काळात नोकरदार लोकांना कामाच्या ठिकाणी मान-सन्मान मिळू शकेल तसेच त्यांना करिअरमध्ये प्रगतीची शुभ संधी निर्माण होऊ शकते. तुमचे मोठमोठ्या लोकांशी संबंध वाढू शकतात; ज्याचा तुम्हाला फायदा होऊ शकेल. तसेच अविवाहित लोकांना यावेळी लग्नााचा प्रस्ताव येऊ शकतो. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांना चांगला नफा मिळू शकतो.

मकर राशी
मकर राशीच्या लोकांसाठी बुध आणि शनी यांचा संयोग शुभ ठरू शकतो. या काळात जे लोक नोकरीच्या शोधात आहेत किंवा नोकरी बदलू इच्छितात, त्यांना चांगल्या संधी मिळू शकतात. त्यामुळे तुमचे उत्पन्न वाढेल आणि तुम्हाला वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक लाभही मिळू शकेल. तसेच बुध ग्रहाच्या प्रभावामुळे समाजात त्यांचा प्रभाव वाढेल; ज्यामुळे लोक प्रभावित होतील. त्याच वेळी ज्यांचा करिअर आणि व्यवसाय मार्केटिंग, संवाद व भाषणाशी संबंध आहे, त्यांच्यासाठी हा काळ चांगला असू शकतो.

Leave a Comment