शनिचा उदय या 5 राशींसाठी होणार नशिबाचा भाग्योदय, मिळेल पगारवाढीची खुषखबर!

शनी आपल्या राशीत अर्थात कुंभ राशीमध्ये संक्रमण करणार असून, 17 मार्च रोजी पहाटे 4 वाजून 40 मिनिटांनी शनीदेवाचा उदय होणार आहे. शनी उदय झाल्यामुळे लोकांना अनुकूल परिणाम मिळू लागतात. लोकांच्या जीवनातील समस्या संपुष्टात येऊन नशिबाची चांगलीच साथ मिळते.

जेव्हा शनी उदय अवस्थेत असतात त्यावेळी लोकांच्या जीवनात जणू काही नवीन ऊर्जेचा संचारते तसेच आशेचे नवे किरण निर्माण होतात. ज्या व्यक्ती अनेक दिवसांपासून पदोन्नती आणि वेतनवाढीच्या प्रतीक्षेत होत्या, त्यांना लवकरच आनंदाची बातमी मिळणार आहे. चला जाणून घेऊया कोणत्या राशींना शनी उदयाचा सर्वाधिक फायदा होईल.

​शनि उदयाचा मेष राशीवर प्रभाव
शनीच्या उदयामुळे मेष राशीच्या लोकांची प्रगती होणार असून, बऱ्याच काळापासून अपूर्ण राहिलेली महत्त्वाची कामे पूर्ण होतील. व्यावसायिक जीवनात यश मिळेल आणि प्रामाणिकपणे आणि मेहनतीने केलेल्या कामाचे योग्य फळ मिळेल. तुम्हाला फायदा होईल आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची मदत देखील मिळेल.

तुमची आर्थिक स्थिती देखील सुधारेल तसेच पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. कौटुंबिक कामासाठी एखाद्या महत्त्वाच्या सहलीला जावे लागू शकते. यावर उपाय म्हणून दर शनिवारी बजरंग बाणाचे पठण करा.

​शनि उदयाचा वृषभ राशीवर प्रभाव
शनीच्या उदयामुळे वृषभ राशीच्या लोकांची प्रतिष्ठा वाढेल आणि पैशाशी संबंधित योजना यशस्वी होतील. नशिबाची पूर्ण साथ मिळेल आणि रखडलेली सर्व कामे पुन्हा मार्गी लागतील. तुमची मेहनत यशस्वी होईल आणि तुमच्या संपत्तीत वाढ होईल.तुमच्या कार्यक्षेत्रात प्रगती कराल आणि तुम्हाला कोणत्याही इच्छित ठिकाणी बदली मिळू शकते. दांपत्य जीवनातील तणाव टाळा आणि वादविवादा पासून दूर राहा. यावर उपाय म्हणून दर शनिवारी काळ्या मुंग्यांना पीठ खायला द्यावे.

​शनि उदयाचा सिंह राशीवर प्रभाव
शनीच्या उदयामुळे सिंह राशीच्या लोकांना व्यवसायात उत्तम यश मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात तुमच्या सर्व योजना यशस्वी होतील आणि तुम्हाला दीर्घ नफा होईल. व्यवसाय वाढवण्याचा विचार करत असाल तर त्यासंबंधीच्या योजनांवरही काम सुरू होऊ शकते. बिझनेस ट्रीप दिसते आहे आणि ती तुमच्यासाठी लाभदायक ठरणार आहे. व्यवसायात प्रगती अगदी जोरदार आहे. बँकेकडून कर्जही मिळेल. यावर उपाय म्हणून दर शनिवारी काळे कपडे दान करावेत.

​शनि उदयाचा तुळ राशीवर प्रभाव
तुळ राशीच्या लोकांना शनीच्या उदयामुळे संतती सुख आणि तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळेल. परीक्षेची तयारी करणाऱ्यांना यश मिळू शकते. तुमचे प्रेमसंबंध वाढतील. कुटुंबाशी तुमचे सामंजस्य चांगले राहणार आहे. नोकरीत बदल करण्याचा विचार करणाऱ्यांना यश मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या उत्पन्नातही वाढ होईल. जोडीदारासोबत बराच वेळ व्यतीत कराल. उपाय म्हणून शनिवारी काळे हरभरे खा.

​शनि उदयाचा मीन राशीवर प्रभाव
मीन राशीच्या लोकांना शनीच्या उदयाचा फायदा होईल. जर तुम्ही बऱ्याच दिवसांपासून परदेशात जाण्याचा विचार करत असाल, तर तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते आणि तुमचा व्हिसा लागू होऊ शकतो. अशा वेळी आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. तथापि, आपली आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होईल. कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. विश्रांतीसाठीही थोडा वेळ काढा. दर शनिवारी काळे तीळ वाहत्या पाण्यात सोडावेत.

Leave a Comment