कोणत्याही संकटातून क्षणात मुक्तता मिळवण्यासाठी स्वामींच्या गुरूचरित्रातील या ओवीचा करा पाठ!

राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री स्वामी समर्थ महाराज की जय… मित्रांनो संकट समयी सर्व प्रथम आपण देवाचा धावा करतो. परंतु मित्रांनो जेव्हा कधी तुमच्या कुटुंबावर तुमच्या घरावर एखादा मोठ संकट येईल एखादी आपत्ती येईल तेव्हा गुरुवारच्या दिवशी एक छोटीशी उपासना आपण नक्की करा एक छोटीशी साधना ज्यामुळे संकट नक्कीच दूर होतील.

ही साधना कशी करावी हे आज आपण जाणुन घेऊयात. एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे ही साधना फक्त आणि फक्त पुरुषांनी करायची आहे स्त्रियांनी नव्हे. गुरुवारच्या दिवशी सकाळी लवकर उठून आपण स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहेत. ज्यांना शक्य असेल त्यांनी नवे कोरे वस्त्र नेसून देवापुढे बसावे.

आपण आपले तोंड पश्चिम दिशेला करुन बसावे. समोर पाट ठेवावा आणि त्या पाटावर एक स्वच्छ वस्त्र अंथरून त्यावर स्वामींची मूर्ती किंवा फोटो असेल तर फोटो पुर्व दिशेला तोंड करून ठेवावा. मित्रांनो ही मूर्ती किंवा फोटो स्वच्छ पुसून ठेवावा. नसेल तर तो ओल्या फडक्याने स्वच्छ करा आणि त्यावर सुवासिक फुलाने जल शिंपडायचं आहे.

जर मूर्ती असेल तर आपण त्या मूर्तीला पंचामृत स्नान घालू शकता मात्र जर तसं करणं शक्य नसेल तर फक्त त्या मूर्तीला साफ करावं आणि त्यावरती एखाद्या सुवासिक फुलाने आपण पाणी शिंपडाव. त्यानंतर ज्या प्रकारे आपण देवपूजा करतो अगदी त्याच प्रकारे या मूर्तीला किंवा या फोटोला आपण गंध लावायचा आहे फुले अर्पण करावी. धूप दीप म्हणजेच अगरबत्ती लावायचे आहे दिवा लावायचा आहे अशाप्रकारे आपण श्री गुरुदेव दत्त यांची प्रथम पुजा करायची आहे.

श्री दत्ताची आणि स्वामी समर्थांची आरती म्हणावी आणि त्यानंतर एका वाटीमध्ये थोडी हळद ओली करून काडीने आपण एका सफेद रंगाच्या कागदावर या हळदी युक्त पाण्याने तुमच्यावर जे संकट ओढावले आहे जी आपत्ती तुमच्यावर कोसळलेली आहे ते लिहावे. लिहिताना कदाचित तुम्हाला ते स्पष्टपणे लिहिता येणार नाही काळजी करू नका.

पूर्ण श्रद्धेने आपण हे करा जरी अक्षर पुसट अस्पष्ट दिसत असली तरीसुद्धा ती भावना दत्तापर्यंत नक्की पोहोचते. लक्षात ठेवा अशाप्रकारे आपली जी संकट आहेत ती लिहिल्यानंतर आपण हा कागद स्वामींच्या चरणी ठेवायचा आहे आणि त्यानंतर या कागदाला सुद्धा गंध अक्षदा वहायच्या आहेत. फुले वहायची आहेत.

अशाप्रकारे हा उपाय झाल्यानंतर आपणास मी गुरुचरित्रामधील एक ओवी सांगतो आहे जीचे 52 वेळा पूर्ण श्रद्धेने भक्ती भावाने पठण करायचे आहे. 52 वेळा, आता हे मोजणार कसं ? तर एखाद्या धान्याचे आपण 52 दाणे घ्या आणि त्या 52 दाण्यांच्या मदतीने आपण या ओव्या म्हणू शकतात.

तर मित्रांनो त्या प्रभावी ओव्या पुढीप्रमाणे आहेत..
“उद्धरावया भक्तजना अवतरलासी नारायणा वासना जशी भक्तजना संतुष्टआवे तेणे परी ऐसी तुझी ब्रीद ख्याती वेद पुराणी
वाखाणती भक्तवत्सला श्री गुरुमूर्ती विनंती माझी परि सावी!”

अशा प्रकारे मनोभावे तुम्ही 52 वेळा श्रद्धेने या ओव्या म्हणायच्या आहेत आणि या ओव्या म्हणून झाल्या की संकटातून मुक्त करण्याची प्रार्थना करायची आणि त्यानंतर त्या कागदाची व्यवस्थित घडी करून जर तुमच्याकडे गुरूचरित्राची पोथी आहे तर त्या पोथीच्या खाली हा कागद ठेवू शकता किंवा देवाजवळच घडी करून आपण हा कागद ठेवला तरीही चालेल. त्यासाठी एखादी डबी घ्या. कागद व्यवस्थित घडी करून डब्बीत ठेवावा आणि ती डबी देवाजवळ ठेवून द्यावी.

मित्रांनो आपण गुरुवारच्या दिवशी स्वामींची कृपादृष्टी मिळावी म्हणून उपासना करतोय तेव्हा या दिवशी जर शक्य असेल तर उपवास नक्की करा. कारण उपवास केल्याने आपलं शरीर,मन शुध्द होते. आपले सामर्थ्य वाढते आणि आपला आत्मविश्वास वाढतो. तर अशा प्रकारे मोठमोठी संकटे दूर करणारी अशी ही साधना आहे विश्वास ठेवा या संकटातून माऊली आपल्याला नक्की बाहेर काढतील. स्वामी आपल्या सेवेचे फळ लवकरच देतील… श्री स्वामी समर्थ महाराज की जय.. ?

Leave a Comment