तुम्ही कितीही कमवा एक रुपया देखील टिकत नाही मग तुमच्याही घराला या २ बाधा झाल्या आहेत, जाणून घ्या सविस्तर!

मित्रांनो तुम्ही खूप कष्ट करताय, तुम्ही दुकानदार,व्यापारी,नोकरदार असाल परंतु तुम्ही तुमच्या घरामध्ये कोणत्याही मार्गाने पैसा कमवत असाल आणि तो पैसा घरामध्ये टिकत नसेल तर मित्रांनो यामागे तुमची काही चूक नसते. काही वेळेस आपले ग्रहमान दोषीत असल्यामुळे किंवा काही बाहेरच्या बाधा असल्यामुळे सुद्धा असं होऊ शकते. तर चला जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या गोष्टी.

पहिली गोष्ट आहे ती म्हणजे तुमचं ग्रहमान जर व्यवस्थित नसेल, साडेसाती, शनी जर तुमच्या राशीला लागली असेल तर तुम्हाला खूप अडचणी येऊ लागतात. अशावेळी जर ग्रहमान दोषीत असेल तर तुम्हाला ग्रहांची शांती केली पाहिजे. किंवा असे काही दागिने असतात त्याचा प्रभाव तुमच्या घरातील ज्याच्या कुंडलीमध्ये शनी प्रवेश झाला आहे त्यांना शमन करण्यासाठी ज्योतिषशात्रामध्ये काही उपाय सांगितले आहेत.

चांगल्या एखाद्या तद्न्य माणसाकडून ज्याचं चांगलं नाव आहे अशाकडून तुम्ही मार्गदर्शन घेणं खूप गरजेचं असतं. त्याचबरोबर दुसरी गोष्ट असते ती म्हणजे तुमच्या घराला बाहेरून जर काही बाधा झालेली असेल म्हणजेच तुमच्या घरात एखादा व्यक्ती पित्रदोषाने ग्रसित असू शकतो, तुमच्या घरात पितरांची शांती झाली नसेल त्या घरात सुद्धा अशा अडचणी येऊ लागतात.

तर मित्रांनो या २ गोष्टी असल्या तर घरामध्ये अडचणी येऊ लागतात. अडचणी आल्यामुळे पैसा टिकत नाही, मग तुम्ही कितीही कमवत असाल तो कोणत्या न कोणत्या मार्गाने जात असतो. म्हणून या २ गोष्टी तुम्ही लक्षात घेतल्या पाहिजेत आणि चांगल्या तद्न्य माणसाकडून उपाययोजना केली पाहिजे किंवा तुमचा जो पैसा येणार आहे त्याच योग्य नियोजन होत नसेल तर नियोजनाच्या अभावी अशा गोष्टी होऊ शकतात.

Leave a Comment