तुम्हीही दारात येणार्‍या मुक्या जनावराला पोळी खाऊ घालताय मग नक्की जाणून घ्या या गोष्टी!

आपल्या भारतीय संस्कृती मध्ये आपल्याला प्रत्येक मुक्या प्राण्यांना काही तरी खाऊ घालावे तसेच त्यांची काळजी घ्यावी असे संगितले जाते. त्याचबरोबर आपल्या संस्कृतीत असेही सांगितले आहे की निसर्गाकडून ज्याच्या गोष्टी आपल्याला मिळतात त्यांचेही आपण पूजन केले पाहिजे आणि त्यासाठी निसर्गाचे आभार देखील मानले पाहिजे.

कारण प्रत्येक निसर्गाने दिलेली वस्तू आपल्या त्या पासून काही ना काही भेट मिळत जाते. मित्रांनो निसर्ग म्हणजेच झाडे प्राणी पक्षी यांच्यापासून आपल्याला कळत नकळत अनेक वेळा मदत होत असते आणि वनस्पती असो किंवा प्राणी, पक्षी हे आपल्याला काही ना काही मदत करत असतात.

मित्रांनो, आपण आपल्या शास्त्रांमध्ये सांगितलेल्या अनेक नियमांचे पालन करत असतो आणि निसर्ग मधील काही गोष्टींची पूजा करत असतो यामध्ये आपण झाडाची पूजा करतो, नागपंचमीला नागाची तर बैल पोळ्याला आपण बैलाची पूजा करतो. तर एखाद्या व्यक्तीच्या श्राद्धच्या दिवशी आपण कावळ्याचे पूजन करून पण त्यांचे आभार मानतो. मित्रांनो आपली भारतीय संस्कृती ही आपल्यला सर्व प्राण्यांविषयी किंवा पक्षा विषयी आपल्याला दयाभाव शिकवते.

आपल्या पूर्वजाने या सर्व प्राण्याचे त्यांच्या वागण्याने आल्या जीवनात काही ना काही फरक जाणवत असतो असे संगितले आहे. अशाच काही प्राण्या बदल आणि पक्षा बदल आपण आज माहिती जाणून घेऊ. ज्या मुले आल्या जीवनात काय फरक जाणवत असतो. आपण गया हि आपल्या संस्कृती मध्ये सर्वात पूजनीय मानले जाते. प्रत्येक जण गायीची पूजा करत असतो. असे मानले जाते कि गायीच्या पोटात ३३ कोटी देवी देवतांचा वास असतो. म्हणून आपल्या शास्त्रामध्ये गायीला पवित्र मानले आहे.

मित्रांनो वास्तुशास्त्रानुसार जर का आपल्याला ज्या ठिकाणी घर बांधायचे आहे त्या ठिकाणी काही दिवस गया व वासरू बांधून ठेवावे, त्यामुळे त्या ठिकाणची नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते. तसेच आपण एका शुभ काम साठी जात आसनात अचानक गया व वासरू दिसले तर ते शुभ संकेत मानले जाते.

मित्रांनो दुसरा प्राणी म्हणजे कुत्रा. आपल्या शास्त्रांमध्ये असे मानले जाते की कुत्र्याला जर का आपण आनंदी ठेवले तर तो यमदेवाला आपल्या जवळ येऊ देत नाही. त्याचप्रमाणे आपण कुत्र्याला अन्न खाऊ घेतले तर भैरोनाथ प्रसन्न होतात व अचानक येणाऱ्या अडचणी पासून आपले स्वरक्षण करतात. कुत्र्याला भविष्यात येणाऱ्या समस्या बदल आधीच समजते. म्हणून कुत्रा हा प्राणी देखील आपल्यासाठी अत्यंत फायदेशीर आणि आपल्या अनेक अडचणी दूर करण्यासाठी आपली अप्रत्यक्षपणे मदतच करत असतो.

मित्रांनो, आपल्या वास्तुशास्त्रानुसार पितृ पक्षात कावळ्याला अन्न देणे खुप चागले मानले जाते. त्याचबरोबर असे ही मानले जाते की कावळ्याने अमृताची चव चाखली होती. कावळ्याला भोजन दिल्याने आपल्याला असलेले बरेच दोष कमी होतात, जर का आपल्याला पितृदोष, कालसर्प दोष असेल तर तो सुद्धा कमी होतो. घरा समोर कावळा जर ओरडत असेल तर आपल्या घरी पाहुणे येतात. जर का कावळा आपल्या घराच्या उत्तर दिसेल ओरडत असेल तर आपल्या घरात लक्ष्मी मातेचे आगमन होते असे मानले जाते.

मुंग्या या आपण रोज पाहतो. पण मित्रांनो आपण जर का त्यांच्या बदल थोडी माहिती घेतली तर आपला आश्यर्य वाटेल कि त्या आपल्या वजन पेक्षा कितीतरी जास्त वजन उचलतात. तसेच त्या सर्वात जास्त कष्ट करतात. त्याच बरोबर त्या एकत्रत कष्ट करण्यावर प्रधान्य देतात. जर का आपण मुग्यांना अन्न दिले, जसे कि साखर, पीठ या गोष्टी आपण मुंग्यांना दिले तर आपली कर्ज पासून मुक्तता तसेच आपल्या सहस्त्र भोजन दिल्या सारखे सुद्धा होते असे मानले जाते.

त्याच बरोबर वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेला एक प्रभावी उपाय ही आपण शेवटी पाहणार आहोत तो उपाय म्हणजे आपण गायीला जर का हिरवा चार खाऊ घेतला तर आपल्या येणाऱ्या बऱ्याच अडचणी कमी होतात. तसेच पोळी गूळ आणि चणा दल असे जर का गायीला दिल्यास माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्या घरातील धन संपत्तीत वाढ होते त्याचबरोबर आपल्या कुटुंबावर आलेल्या संकटांपासून ही आपली लवकरात लवकर सुटका होते.

Leave a Comment