वसंत पंचमीला माता सरस्वतीला अर्पण करा या 5 गोष्टी, शारदा देवी देईल भरभरून आशीर्वाद!

वसंत पंचमीच्या दिवशी देवी सरस्वतीची पूजा केली जाते आणि मातेला पिवळ्या वस्तू अर्पण केल्या जातात. पिवळा रंग सरस्वती मातेला प्रिय आहे. म्हणून या दिवशी देवी सरस्वतीची पूजा पिवळे वस्त्र परिधान करून केली जाते आणि तिला पिवळे पदार्थ आणि फळे अर्पण केली जातात.

असे मानले जाते की वसंत पंचमीचा सण सरस्वती मातेचा जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो. यावर्षी वसंत पंचमी 14 फेब्रुवारीला आहे. वसंत पंचमीच्या दिवशी सरस्वती मातेला कोणच्या पदार्थांचा नैवेद्य अर्पण करतात आणि त्याचे महत्त्व काय आहे.

केशरी भात
वसंत पंचमीच्या पूजेमध्ये सरस्वती मातेला केशरी गोड भात अर्पण करणे खूप चांगले मानले जाते. पिवळा तांदूळ तूप, साखर, केशर आणि पंचमेवा मिसळून तयार केला जातो. मातेला नैवेद्य अर्पण केल्यानंतर किमान ५ मुलींना तो खाऊ घालतात. जे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत त्यांना हा प्रसाद म्हणून द्यावा.

राजभोग
वसंत पंचमीच्या दिवशी पूजा केल्यानंतर भोग म्हणून माता सरस्वतीला राजभोग अर्पण करावा. माता सरस्वतीला पिवळ्या रंगाचा राजभोग खूप आवडतो. राजभोग अर्पण केल्यानंतर तो प्रसाद म्हणून सर्वांना द्यावा. असे केल्याने तुमचे सौभाग्य वाढते आणि माता सरस्वतीच्या कृपेने तुम्हाला सद्बुद्धी प्राप्त होते.

‘बोरं’ आहेत मातेला प्रिय
सरस्वती देवीला पिवळी फळे फार आवडतात. फळांचा नैवेद्य तुम्ही सरस्वती मातेला अर्पण करू शकता, त्यामुळे मातेचे आशिर्वाद तुम्हाला मिळतात. बंगाली समाजातील लोक वसंत पंचमीला देवी सरस्वतीला पुष्पहार अर्पण केल्यानंतरच स्वत: बोरं खातात. वसंत पंचमीला जो पाच फळांचा नैवेद्य दाखवला जातो त्यात बोरांचा समावेश नक्की करा.

बेसनाचे लाडू
सरस्वती मातेला बेसनाचे लाडू अर्पण केल्याने ती प्रसन्न होऊन सुखी आणि समृद्ध होण्याचा आशीर्वाद देते. त्याचबरोबर तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. वसंत पंचमीच्या दिवशी बेसनाच्या लाडूचा नैवेद्य दाखविल्यामुळे तुमच्या बोलण्यात गोडवा वाढतो आणि समाजातील लोकांमध्ये तुमचा प्रभाव पडतो, असे ही म्हणतात.

मालपुआ
ज्या घरात विद्यार्थी शिक्षण घेत असतात त्या घरी सरस्वती पूजेचे आयोजन करावे आणि सरस्वती मातेला मालपुआ अर्पण करावा. जर तुमचे मूल अभ्यासात कमकुवत असेल तर आई सरस्वतीला त्याच्या हातून मालपुआचा नैवेद्य दाखवावा आणि गरजू लोकांमध्ये वाटावा.
अनिता किंदळेकर यांच्याविषयी

Leave a Comment