घरात धनधान्याची बरकत कायम राहण्यासाठी… स्वामींना या दिवशी फक्त एक नारळ करा अर्पण

प्रत्येक जण पैसे कमविण्यासाठी काही ना काही काम किंवा व्यवसाय, उद्योग धंदा करत असतो. पैसे कमवून आपल्या कुटुंबाच्या सगळ्या गरजा पूर्ण करणं हा प्रत्येक मनुष्याचा उद्देश असतो. बऱ्याच लोकांना पैसे कमवताना अनेक अडचणी येतात.

आपण खूप मेहनत करतो पण मेहनतीच्या मानाने आपल्याला मोबदला मिळत नाही. मित्रांनो याच्या मागे अनेक कारणं असतात. आपल्याला आपल्या कामाच्या मनाने मोबदला मिळत नसेल तर त्यामागे आपल्या घरात आपण करत असलेल्या छोट्या छोट्या चुकीच्या पद्धतींचा अवलंब कारणीभूत ठरतो.

आपण करत असलेल्या याच चुका सुधारण्यासाठी काही उपाय आणि तोडगे आपल्या वास्तू शास्त्रात आणि ज्योतिषशास्त्रात सांगितले आहेत. त्यातलाच एक उपाय म्हणजे नारळ. मित्रांनो नारळाला श्रीफळ असं सुद्धा म्हटलं जातं. नारळाचा योग्य प्रकारे वापर केला तर आपल्याला धनसंपत्ती, पैसा कमवताना येणाऱ्या अडचणी दूर होऊ शकतात. आणि आपण त्या अडचणींवर मात करून खूप पैसा कमवू शकता. चला तर जाणून घेऊयात आपल्याला या नारळाचे नेमके काय करायचे आहे..

या उपायासाठी आपल्या घरीच जर नारळाचे झाड असेल तर उत्तमच.. त्या झाडाचा एक चांगला नारळ घ्या मित्रानो तुमच्या घरीच जर नारळाचे झाड असेल तर खूपच उत्तम. त्या नारळाच्या झाडाचा एक चांगला असा नारळ घ्या. घरी झाड नसेल तर बाजारातून चांगला नारळ विकत घेऊन या. लक्षात ठेवा आपल्याला नारळ सोलायचा नाहीये, त्याची साल तशीच ठेवायची आहे. तर असा हा नारळ स्वामींच्या मूर्ती किंवा फोटो असेल तर त्या फोटो समोर ठेवायचा आहे.

त्या नंतर श्री स्वामी समर्थ महाराजांची मनोभावे पूजा करायची आहे. पूजा केल्या नंतर हा नारळ आपण आपल्या दोन्ही हातामध्ये घ्यायचा आहे. मित्रांनो आपल्या दोन्ही हातात नारळ धरून आपली जी कोणती इच्छा आहे, आपल्या ज्या काही समस्या आहेत, ज्या काही अडचणी आहेत त्या आपण स्वामींपुढे मांडायच्या आहेत. आणि पुन्हा तो नारळ स्वामींच्या मूर्ती जवळ किंवा फोटोच्या पायथ्याशी ठेवायचा आहे. अशा प्रकारची पूजा आपल्याला सलग 7 दिवस करायची आहे.

परंतु मित्रानो या पूजेची सुरुवात करण्यासाठी गुरुवारचा दिवस अत्यंत शुभ आणि लाभदायक मानला जातो. म्हणजेच या गुरुवार पासून पुढच्या गुरुवार पर्यंत आपल्याला हा उपाय करायचा आहे. आपण 7 दिवस हा उपाय केल्या नंतर आपल्याला हा नारळ आपल्या जवळच्या नदीमध्ये सोडायचा आहे. ओढ्यात सोडला तरी चालेल. थोडक्यात सांगायचं तर पाणी वाहते असेल तिथे आपण हा नारळ विसर्जित करू शकतो. मित्रांनो हा हा नारळ विसर्जित केल्या नंतर काही दिवसांनी आपल्या ज्या समस्या आहेत, आपल्या पैशा संबंधी काही अडचणी असतील तर त्या सर्व अडचणी दूर होताना तुम्हाला दिसतील.

आपल्या घरा मध्ये धनसंपत्ती पैसा येऊ लागला आहे असं तुम्हाला जाणवेल. काही दिवसांनंतर तुम्हाला तुमच्या पूर्ण समस्या सुटलेल्या दिसतील. तुमच्या घरात सुख, समृद्धी, ऐश्वर्य, समाधान सर्व काही नांदू लागेल. या दरम्यान आपल्याला रोज स्वामींची पूजा करायची आहे आणि पूर्ण दिवसामध्ये जेव्हा पण आपल्याला वेळ मिळेल तेव्हा स्वामींचे नामस्मरण करायचे आहे. त्याच बरोबर रोज सकाळी आंघोळ केल्यानंतर आणि रात्री झोपताना आपण “ओम श्री स्वामी समर्थाय नमः” या मंत्राचा मंत्र जप करायचा आहे.

Leave a Comment